अकोला जिल्ह्यातील ESICअंतर्गत येणाऱ्या कामगारांना खासगी रुग्णालयाची आरोग्यसेवा मिळवण्यात संघर्ष…कंत्राटी कामगार समितीला यश.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
पारस औष्णिक विद्युत केंद्र येथील समस्त कंत्राटी कामगार यांनी स्वयम् स्थापित संघर्ष कंत्राटी कामगार समिती ने ESIC अंतर्गत खाजगी रुग्णालयांची मागणी मिळवण्याकरिता 2019 पासून जिल्हाधिकारी कार्यालय ESIC शाखा कार्यालय अकोला तथा ESIC सेवा दवाखाना अकोला उप क्षेत्रीय कार्यालय नागपूर तथा क्षेत्रीय कार्यालय मुंबई पर्यंत स्वतः भेटून निवेदन ई-मेल द्वारे खाजगी रुग्णालयांची सेवा मिळत नसल्याचे संघर्ष कंत्राटी कामगार समिती अध्यक्ष सतीश अशोक तायडे यांनी निदर्शनास आणले व त्यांच्या या प्रयत्नांना ESIC च्या राष्ट्रीय आरोग्य अधिकारी सोबत झालेल्या करारानुसार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्न असलेल्या अकोला जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयाच्या यादीनुसार सर्व ESIC विमाधारकांना दिनांक 11/01/2021 पासून सदर योजनेचा लाभ घेता येईल. याचे विमा धारकांनी व कुटुंबीयांनी नोंद घ्यावी सदर योजनेचा ESIC च्या ही पहचान कार्ड च्या माध्यमातून घेता येईल आणि औष्णिक विद्युत केंद्र पारस च्या मा मुख्य अभियंता खटारे साहेब व कामगार कल्याण अधिकारी मेंढेकर साहेब यांनी पत्रव्यवहार द्वारे पारस मधील कंत्राटी कामगारांना प्रथम वैद्यकीय आरोग्य सेवा दवाखाना मिळण्यासाठी मोलाची भूमिका घेऊन लवकरच पारस येथे सेवा दवाखाना सुरू होत आहे व या मागणीला यशापर्यंत पोहोचवण्यात संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे अध्यक्ष सतीश तायडे नितेश तायडे (उपाध्यक्ष) मनोहर अवचार (सचिव )रामेश्वर खंडारे (सह सल्लागार) मुरसलीन खान ,पवन खत्री, नितीन ठाकरे व समस्त सदस्य पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले. ESIC डिस्पेंसरी येथील मा. योगेश कोल्हे साहेब ,अशोक रोटे ,डॉ. जोशी मॅडम तथा मा निखिल सरोदे साहेब आणि नागपूर येथून डॉ. मीना देशमुख मॅडम, डॉ. हुलके साहेब तथा मुंबई येथून मा धुळाज साहेब आयुक्त तथा दत्तात्रेय कांबळे साहेब SMO यांनी सदर प्रकरणांमध्ये खूप जातीने दखल घेऊन अकोला जिल्ह्यातील समस्त कामगार जे ESIC अंतर्गत येतात त्यांना आरोग्य विषयी जो न्याय मिळवून दिलेला आहे त्याबद्दल संघर्ष कंत्राटी कामगार समिती औष्णिक विद्युत केंद्र पारस यांच्यावतीने आभार आणि PMJAY मध्ये पहिला लाभार्थी म्हणून कमल किशोर भरतीया यांची नोंदणी सुध्दा केली आहे PMJAY चे डाॅ. अश्विनी खडसे मॅडम, डॉ.श्रीकांत टेकाडे साहेब, डॉ.प्रकाश डिकार साहेब, रमेश वाडेकर साहेब या सर्व पदाधिकारी नोंदणीच्या वेळेस हजर राहून योजने विषयी योग्य माहिती व मार्गदर्शन केले आणि यापुढेही यांचे मार्गदर्शन असेच अकोला जिल्ह्यातील सर्व कामगारांना मिळेल अशी विनंती संघर्ष कंत्राटी कामगार अध्यक्ष सतिश तायडे यांच्याकडून करण्यात आली.