पातुर तालुका ग्रामपंचायत 87 मतदान केंद्रावर 76.27% मतदान शांततेत.

पातुर तालुक्यात तरुण मतदारांचा प्रचंड प्रतिसाद परिवर्तनाकडे वाटचाल.
लक्ष निकालाकडे पातुर तालुका 23 ग्रामपंचायत मतदान 76.27℅
अविनाश पोहरे –
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला 221 जागांसाठी 474 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. 219 जणांनी याआधी माघार घेतली असून 32 उमेदवार अविरोध झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती शिर्ला 63.84% आणि आलेगाव सह सस्ती , दिग्रस बुद्रुक, दिग्रस खुर्द, बेलुरा बुद्रुक, तांदळी बुद्रुक, बेलुरा बुद्रुक, पास्टुल, विवरा, चतारी, उमरा, राहेर .मलकापूर, देऊळगाव, चान्नी, खानापूर , भंडारज खुर्द , चरणगाव, मळसुर सायवनी, पिंपळखुटा ,चांगेफळ या 23 गावांमध्ये 221 जागांसाठी 474 उमेदवार आपलं नशीब यासाठी रणसंग्राम मध्ये उतरले होते तेवीस ग्रामपंचायती करता एकूण 49 हजार 121 मतदार होते. त्यापैकी 37464 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वीस किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या शिर्ला ग्रामपंचायतीच्या सहा वॉर्डांमध्ये प्रचारासाठी उमेदवारांना दमछाक करावी लागली आहे. शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये 17 जागांसाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये युती होती मात्र इतर राजकीय पक्ष तथा स्थानिक प्रभावी उमेदवार याचा समन्वय साधून पॅनल उभे केले होते यामध्ये भाजपा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश होता प्रामुख्याने शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये पातुर नगरपरिषदेचे चार वार्डातील मतदारांनी मतदान केले नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणारे सर्वच राजकीय दिग्गज या निवडणुकीत उतरले होते यामुळे शिर्ला ग्रामपंचायतचे निवडणुकीमध्ये राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
चोख बंदोबस्त – पातुर तहसील निवडणूक अधिकारी तहसीलदार दीपक बाजड यांचे मार्गदर्शनाखाली कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त चोख होता यामध्ये एकूण 87 मतदान केंद्रावर 348 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये 31 पडदानशीन केंद्र होते तर 75 रिझर्व होते यामध्ये संवेदनशील केंद्र सुद्धा होते त्यामध्ये पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत 16, चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत 18 होते. यावेळी ठाणेदार हरीश गवळी, ठाणेदार गजानन सिंह ठाकुर बायस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.