त्रिरत्न बुद्ध विहार मध्ये दीप प्रज्वलित करून धम्मचक्र दिन साजरा

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस शांतीचा संदेश देत या विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून दिपप्रज्वलन रामकृष्ण भाऊ तायडे, उत्तमराव सरदार , यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पंचशिलेच्या झेंड्याचे सुद्धा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन हे प्रभाकरराव दामोदर यांनी केले. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने दहिगाव मध्ये त्रिशरण पंचशील घेण्यात आले. धम्मचक्र 64 वा परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माची शिक्षा घेऊन चंद्रमणी समेस या बहुजनांना दिली. या वर्षी सुरू असलेले covid-19 मुळे हा कार्यक्रम थोडक्यात घेण्यात आला कुठलीही गर्दी न होऊ देता या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यावेळी उपस्थित मध्ये महिला रेखाताई शिरसाट, सविता ताई तायडे, शालुबाई तायडे, भारतीताई इंगळे, रूपालीताई तायडे, व पुरुष मंडळी जितेंद्र भाऊ इंगळे, अरुण भाऊ शिरसाट, सचिन भाऊ तायडे, आकाश भाऊ सरदार व इतर उपस्थित होते