उमेद च्या माध्यमातून महिलांनी साधली विकासाची कास..!

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
आज दि. 3 फेब्रुवारी 2021 रोजी ग्राम व्याळा येथे भारतीय स्टेट बँक शाखा व्याळा तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 56 महिला स्वयं सहायता समूहांना 65.70 रुपयांचे कर्ज प्रकारण मंजूर करण्यात आले आहे. यावेळी क्षत्रिय व्यवसाय कार्यलयाचे सहायक महाव्यवस्थापक श्री. सुहास ढोले सर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. अलोक तोरनिया सर,प्रकल्प संचालक तथा जिल्हा सहसंचालक उमेद, अकोला श्री. सुरज गोहाड सर, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. गजानन महल्ले सर, SBI जिल्हा विक्री केंद्र व्यवस्थापक श्री. भारत पाटील सर, SBI आर्थिक समावेशकता मुख्य प्रबंधक श्री. राधेश्याम चिरनिया सर, SBI व्याला शाखा अधिकारी श्री. एस एस खांडेकर सर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री.घनश्याम धनोकार सर, SBI व्याला सर्व्हिस मॅनेजर श्रीमती. ज्योती राऊत मॅडम, SBI व्याला कस्टमर केयर सहायक श्री. ऋषिकेश देशमुख सर, SBI व्याला कस्टमर केयर सहायक श्री. गणेश मारके सर, उमेद अभियान व्याला प्रभाग समनव्यक श्री. गोपाल भाकरे सर देगाव प्रभाग समनव्यक श्रीमती. भावना चिंचोळकर मॅडम, SBI व्याला ग्राहक मित्र कु. स्वाती ठाकूर मॅडम, बँक सखी प्रणाली ताई कावरे तसेच 56 समूहातील महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एवढया मोठया संख्येने बँक कर्ज मंजूर करण्याची ही भारतातील पाहीलीच वेळ होती।या कार्यक्रम अंतर्गत 56 समूहांना sanction letter देण्यात आले तसेच समूहातील अपघाती मुत्यु झालेल्या अन्नपूर्णा सोळंके यांचे कुटूंबियांना पंतप्रधान सुरक्षा विमा (pmsby) योजनेच्या माध्यमातून 2 लाख चा धनादेश देण्यात आला आहे। कार्यक्रम मध्ये मान्यवरांची मार्गदर्शन वर भाषणे झालीत, यामध्ये आर्थिक व्यवहार, आर्थिक समावेशक, कर्ज परतफेडीचे महत्व, समूहाची दशसूत्री, अभियान बाबत माहिती देण्यात आली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्याळा प्रभागातील प्रेरीका, कॅडर यांनी मोलाचे योगदान दिले।