ताज्या घडामोडी

मल्हार प्रतिष्ठान च्या वतीने सास्तूर येथील अत्याचार घटनेतील नराधमांना फाशीची मागणी

डॉ.संदीप सुशीर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

अंजनगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने व मल्हार प्रतिष्ठान च्या वतीने सास्तूर येथील धनगर समाजाच्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अमानुष पाशवी बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून सदर मुलगी ही अतिशय गंभीर जखमी झाले असून मानसिक रित्या घाबरलेली आहे सदर मुलगी धनगर गरीब कुटुंबातली असून कुटुंबातील सदस्य सुद्धा या घटनेने घाबरलेले आहेत व त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या निषेधार्थ समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा धनगर समाजाच्या वतीने व मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार अंजनगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई न झाल्यास धनगर समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी कुणाल पांडे नीरज नागे अजिंक्य चिकटे सचिन नागे राजकुमार बोदळे राजेश नवरंगे प्रवीण कात्रे भावेश करस्कार राहुल नवलकार योगेश मातकर निखिल करसकार विशाल पातोंड सह धनगर समाज बांधव उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: