कोरोना नियमांचे पालन करुन केला विवाह नवं दाम्पत्याने दिला वेगळा संदेश

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता
हाता येथुन जवळच असलेल्या ग्राम निंबा येथील डॉ हुसेन ह्यांचे चिरंजीव डॉ सै इर्शाद हुसेन ह्यांचा विवाह भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे माजी जिल्हाउपाध्यक्ष साहीब ठेकेदार ह्यांची पुतणी व माजी सरपंच सलीमभाई ह्यांची मुलगी डॉ अफरीन सबा ह्यांचे सोबत पार पडला विशेष म्हणजे डॉ इर्शाद हुसेन ह्यांनी सर्व उपस्थितांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटी शर्ती चे आधीन राहून सर्वाना मास्क व सेनिटारझरचे वाटप करुन एक आगळा आदर्श निर्माण करुन आगळावेगळा विवाह अकोट येथे पार पडला.विवाह मध्ये हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते डॉ इर्शाद हुसेन व डॉ अफरीन सबा ह्यांचे दोन्ही परिवारातील प्रत्येकानी मास्क चा वापर करुन नवविवाहित दांपत्याला सुभेछा दिल्या विशेषतः डॉ इर्शाद हुसेन ह्यांनी कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर निंबा गावात प्रशासनासोबत राहुन कोरोना प्रादुर्भाव कश्याप्रकारे कमी होईल बाबत जनजागृती केली व स्टिकर चे वाटप केले व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये अठराहजार रुपये दिले व निंबा गावातील वर्दळीच्या ठिकाणी सरपंच व पोलीस पाटील ह्यांचे सोबत सेनिटायजर मशीनचे वाटप केले सहकार्य केले तर डॉ अफरीन सबा ह्यांनी अकोला येथे आरबिट रुग्णालयात मेडिकल आफिसर म्हणून म्हणून उत्कृष्ट सेवा दिली अश्या नवविवाहित दांपत्याला परीसरातुन अभिनंदन केले आहे