तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत शिवारफेरीचे आयोजन

गणेश बळकर
ग्रामीण प्रतिनिधी/बाभूळगाव
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा अंतर्गत मनोज सिताराम हानोरे यांनी स्थापन केलेल्या हानोरे सेंद्रिय निविष्ठा उत्पादक शेतकरी गटातर्फे शिर्ला,तालुका पातुर जिल्हा अकोला येथील शेतकऱ्यांसाठी मोफत शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ही शिवारफेरी मोताळा जिल्हा बुलढाणा येथे ग्रीन प्लांटो कंपनीची श्रीमंती 101 या व्हेरायटीचे मिरची पिकाचे भरघोस उत्पादन व व्हायरस मुक्त मिरची प्लांटचे निरीक्षण करण्यासाठी ही शिवारफेरी आयोजित केली होती. मिरची प्लांटवर गेल्यानंतर खरोखरच मिरचीच्या झाडांना भरघोस मिरच्या पहावयास मिळाल्या.एकाही झाडावर व्हायरस पहावयास मिळाला नाही.बाजूच्या दुसऱ्या मिरची पिकावर व्हायरसचा नुकसानकारक प्रभाव दिसून आला.हा अनुभव शेतकऱ्यांनी अनुभवला.या शिवारफेरीमध्ये तुकाराम खरडे,लक्ष्मण ढाळे, अविनाश ढाळे, रघुनाथ ढाळे, उमेश ढाळे, योगेश खरडे, दिगांबर जोगतळे, मोहन आवटे,भीमराव ढाळे, महादेव खरडे, इत्यादी शेतकऱ्यांचा सहभाग होता.यामध्ये शिवारातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.शेतकऱ्यांनी मिरची पीक आपल्या शेतात लाऊन आपल्या उत्पन्नात वाढ करण्याचे ठरविले.शिवारफेरी आयोजित केल्याबद्दल हानोरे सेंद्रीय निविस्टा उत्पादक शेतकरी गटाचे अध्यक्ष मनोज सिताराम हानोरे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.