कायदे व शासकीय धोरणे विषयी आदिवासी मुलींचे प्रशिक्षण…. उन्नती संस्थेचा स्तुत्य उपक्रम…

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
सामाजिक आणि शैक्षणिक बदलासाठी आदिवासींमध्ये गेल्या एक दशकापासून कार्यरत असलेल्या उन्नती संस्थेमार्फत महिला व मुलींसाठी शासनाचे असलेल्या कायदे व शासकीय धोरणे विषयी आदिवासी मुलींचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर लगतच्या बोरव्हा येथे उत्साहात संपन्न झाले…. दरमहा व्यक्तीमत्व विकास व ज्ञान वाढविणे या विषयावर उन्नती संस्थेमार्फत लगतच्या आदिवासी भागात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यापूर्वी संगणक साक्षरता, आर्थिक ज्ञान याविषयी शिबीरे पार पडली. यावेळी अडगाव बु सर्कल मधील धोंडाआखर, भिली, बोरव्हा, चंदनपुर, वस्तापुर, चिचपाणी, नवी तलई आणि मोहपाणी तलई येथील सहभागी मुलींच्या आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात साधनव्यक्ती म्हणून अॅड अतुल काकड यांनी सखोल मार्गदर्शन केले. यात सहभागी महिला व मुलींनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. जसे पतीचे निधनानंतर सासरचे वारसाहक्क देत नाहीत, गावात शासकीय अधिकारी कोणत्याही कामासाठी पैशाची मागणी करतात अशा वेळेस काय करावे? अशा विविध प्रश्नांवर अॅड काकड यांनी समर्पक उत्तरे देऊन मुलींचे समाधान केले. याप्रसंगी कौटुंबिक हिंसाचार कायदा, विधी सेवा समिती, महिला समुपदेशन केंद्र हे प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असते. त्यातून सर्वांना मोफत समुपदेशन केले जाते तसेच एकात्मिक बालविकास योजना कार्यालयात महिला संरक्षण अधिकारी मार्फत मुलींना सहकार्य मिळु शकते अशी माहिती अॅड काकड यांनी दिली. छेडछाड याविषयी मुलींनी न घाबरता व न लपवता सामोरे येवून आपल्या घरच्यांना तसेच पोलीसाना हि बाब सांगणे आवश्यक असुन यामुळे अश्या घटना रोखता येतील या बाबत शिबिरात मुलींनी छेडछाड याविषयी केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना प्रकर्षाने मांडल्या गेली.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद सुर्यवंशी यांनी संचालन राजकन्या गवते यांनी तर आभार प्रदर्शन सचिन मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नंदा ठाकरे, रामसिंग दहिकर, राजकन्या गवते, शरद सुर्यवंशी, निकेश मोरे व सचिन मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.