ताज्या घडामोडी
सस्ती येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला पातूर तालुक्यात चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथील ४२ वर्षीय पुरुषाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ आक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.सस्ती शेत शिवारातील सोनोने यांच्या शेतात असलेल्या गोधन च्या झाडाला मृतक संदीप हिरामण शेळके वय ४२ रा सस्ती ता पातूर यांनी आत्महत्या केली आहे.त्यांच्या अंगावर बँकेचे व खाजगी कर्ज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आला.मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला.त्यांच्या मागे वयोवृद्ध आई ,पत्नीदोन मुलं असा आप्त परिवार आहे..
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.