ताज्या घडामोडी

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत चे सरपंच प्रमोद ज्ञानदेव वाकोडे व उपसरपंच बबिता संजय वानखडे यांच्या विरोधात नऊ पैकी सात ग्रामपंचायत सदस्य यांनी अविश्वास दाखल केला असता सोमवारी अविश्वास पारित झाल्याने सरपंच व उपसरपंच यांना पाय उतार व्हावे लागले
तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठे वजन असणाऱ्या गाडेगाव ग्रामपंचायत च्या नऊ सदस्या पैकी सात सदस्य विजय सदाशिव बोर्डे ,लक्ष्मण रामराव काळे,अरविंद गजानन वानखडे, कीर्ती पद्माकर पिंगळे, माधुरी संजय वडतकार, शारदा गोकुळ हिंगणकर,मंगला गवई या सदस्यांनी सरपंच प्रमोद ज्ञानदेव वाकोडे व उपसरपंच बबिता संजय वानखडे यांच्या विरोधात विकासकामे न करणे ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता स्वतः च्या मर्जीने कामे करणे ,ग्रामपंचायत सदस्य यांना अपमानास्पद वागणूक देने,उपसरपंच पती यांचा कामात हस्तक्षेप या कारणाने तहसीलदार यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला असता त्यावर आज गाडेगाव ग्रामपंचायत मध्ये सभेचे आयोजन केले असता सरपंच प्रमोद ज्ञानदेव वाकोडे यांना एक तर उपसरपंच बबिता संजय वानखडे याना शून्य मते मिळाली असल्याने सरपंच व उपसरपंच या दोघांनाही पायउतार व्हावे लागले या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार तेजश्री कोरे तर सहा. म्हणून नायब तहसिलदार चव्हाण, व गुरव हे होते ठाणेदार विकास देवरे यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: