स्त्री सुसंस्कृत आणि जागृत होणे काळाची आवश्यकता :- आ रणधीर सावरकर

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
संसार रथाची सारथी असलेल्या स्त्रीने आपले सारथ्यकर्म योग्यप्रकारे बजावून रथी असलेल्या पुरुषाला कुटुंबाला यशोमंदिरी नेऊन पोचवावे तिने सुसंस्कृत आणी जागृत होणे काळाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी 20 ऑक्टोबर शासकिय विश्रामगृहात केले
तेल्हारा तालुका महिला आघाडी च्या वतीने नवरात्री उत्सवा निमित्त चौथ्या दिवशी आयोजित सन्मान स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर बोलत होते यावेळी मंचावर भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नयनाताई मनतकार जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ महेंद्र गोयनका न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर न प शिक्षण सभापती आरतीताई गायकवाड आदी मान्यवरची उपस्थिती होते कोविड -19 या महामरित मोलाची कामगिरी बजावणारे आर बी एस के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजलीताई सदाफळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये विक्रमी उत्पन्न काढणारी तालुक्यातील प्रगतीशिल शेतकरी महिला मिनाताई लासुरकार अंगणवाडी सेविका अनिताताई भटकर आर्मीतील पुत्रांची माता शालिनीताई वासनकार आशा वर्कर सीमाताई वानखडे महिला शेतकरी शिलाबाई तेलगोटे दुर्गाताई इंगळे यांचा या वेळेस सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला माहामारि च्या काळात आगामी सण हे घरीच साजरे करा व परिवारांची काळजी घ्या असे आव्हान केले जिल्ह्यामधिल तेल्हारा येथे या पुर्वी महिला अत्याचार विषयी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता व नारि सन्मान सोहळा प्रदेश उपाध्यक्षा नयनाताई मनतकार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला आघाडी मोनिकाताई वाघ व सहकारी यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी चे कौतुक आ रणधीर सावरकर यांनी केले यावेळी शहर सरचिटणीस रवी गाडोदिया गजानन गायकवाड वैद्यकीय आघाडी शहर अध्यक्ष राहुल सदाफळे सहकार आघाडी शहराध्यक्ष अतुल विखे शहर उपाध्यक्ष विजय देशमुख न प गट नेते नरेश गंभिरे तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा अविनाश मनतकार राजेश टोहरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्रदेश महिला उपाध्यक्ष नयनाताई मनतकार यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन मोनिकाताई वाघ यांनी केले