संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार.. विद्यार्थी विद्यापीठाचे कर्मचारी नॉटरिचेबल…

अविनाश एस. पोहरे
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ठरवून दिलेल्या उन्हाळी 2020 च्या परीक्षांचे वेळापत्रकात 3 वेळा बदल करून sgbau pariaksha अँप डेवोलप करण्यात आले होते. परंतू दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी दहा वाजता असणारा पेपर बारा वाजेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचा लॉगइन विद्यापीठांनी बनवलेल्या परीक्षा अँप मध्ये झालेला नाही. या वरून विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार आहे असे लक्षात येते. परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी दिलेले सगळे नंबर नॉट रिचेबल दाखवत आहे. सर्व विद्यार्थी हे गोंधळात पडले असून आता नेमकं करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर येत आहे. नियोजनाअभावी घेतलेले हे निर्णय असून यामध्ये विद्यापीठातील प्राधिकरणाचे वयक्तिक हितसंबंध गुंतलेले असल्याचा अंदाज वाटत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणं हे गरजेचे आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास आणि आर्थिक पिळवणूक याचा अंदाज कदाचित विद्यापीठाला नाही. यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यापीठात तीव्र ठिय्या आंदोलन करेल. लवकरच त्यावर विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन तोडगा काढावा. सुरुवातीला नियोजन करणे आणि नंतरच त्यावरती निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
विशाल लक्ष्मण नंदागवळी
चंद्रपूर जिल्हा निरीक्षक व अकोला जिल्हा प्रवक्ता
(सम्यक विद्यार्थी आंदोलन)