ताज्या घडामोडी
बाळापूर शहर आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर शहरांमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन त्यामध्ये प्रमुख मागण्या मध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळग्रस्त पिकांना प्रति हेक्टर 50000 मदत करावी, पुरामुळे झालेल्या नुसकानाची व फळ बागांची नुसकान भरपाई करण्यात यावी. व शेतकऱ्यांना उर्वरित कर्जमाफीचा लाभ मिळावा.सोयाबीन धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी M.S.P नुसार सरकारी खरेदी चालू करावी.ह्या प्रमुख मागण्या होत्या त्याप्रसंगी आम आदमी पार्टीचे अफरोज खान,नारायनभाऊ बोरकर मो निसार मो याकूब अमृत देशमुख मोहम्मद सदिक,अनंता चव्हाण,भूषण इंगळे, हहिब देशमुख, अजमुद्दिन, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.