कवठा येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

शेषराव बेलुरकर
ग्रामीण प्रतिनिधी /कवठा
कवठा येथे आठ दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे ऐन हंगामाच्या वेळेमध्ये नागरीकांना आपली मजुरी पाडून
नदीवरन पाणी आणण्यासाठी वणवण भटकाव लागत आहे यांचे कारण असे की एका महीन्यापासुन ग्राम पंचायत चा कार्यकाल संपुष्टात आला आहे या साठी इथे प्रशासक नेमणुक व्हायची होती पण ती झाली नाहि त्यामुळे कवठा येथील ग्राम पंचायत चा कारभार हा राष्ट्रपती राजवट सारखा चालू आहे कवठा येथे बॅरेज असल्यामुळे पाणी भरपूर आहे मात्र नियोजना अभावी नागरीकांना त्रास होत आहे यांचे कारण असे की आठ ते दहा दिवसापासून पाणी पाणी पुरवठ्याचा सब मर्शीबल पंप नादुरुस्त असल्यामुळे नळ येत नाही आहे त्यासाठी प्रभारी कामकाज पाहत असलेल्या सरपंचाला विचारणा केली असता पाणी पुरवठा वसुली नसल्यामुळे तसेच ग्रामपंचायती कार्यकाल संपल्या मुळे ग्राम पंचायत मध्ये कुठलाच निधी उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे असे सांगण्यात आले तसेच बंद असलेले पथदीवे चीखलमय रस्ते तसेच तुडुंब भरलेल्या नाल्या अस्या बर्याच समस्या गावामध्ये निर्माण झाल्या आहेत ग्रामस्थ मात्र या मध्ये भरडल्या जात आहे.