हिवरखेड नगरपंचायत होणारच – आ मिटकरी

विधिमंडळ अधिवेशनात गाजणार हिवरखेड नगरपंचायतचा विषय
संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
तथाकथित विकास महर्षींनी नागरिकांना हिवरखेड नगरपंचायत करणे हे माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच असे पोकळ आश्वासन देऊन दोन वेळा निवडून आल्यावरही आपल्या काही लाडक्या कार्यकर्त्यांच्या स्वार्थाच्या दृष्टीने आतापर्यंत जाणीवपूर्वक हिवरखेड नगरपंचायतचा विषय मार्गी लावला नाही हे आता नागरिकांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे आता आ. अमोल मिटकरी हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचात अथवा नगर परिषदेमध्ये होण्यासाठी विधिमंडळात आवाज उचलणार असून विधिमंडळाच्या अधिवेशनात हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते, हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, माहिती अधिकार कार्यकर्ते धिरज बजाज, इत्यादीं अनेक स्तरावरून सुरू असलेल्या सामूहिक पाठपुराव्याला न्याय मिळवून देणार आणि हिवरखेड नगरपंचायत होणार म्हणजे होणारच असे आश्वासन आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड भेटीदरम्यान जागरूक नागरिकांना दिले.
विशेष म्हणजे हिवरखेड ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जवळपास संपुष्टात आला असून कोरोनामुळे निवडणुका घोषित झालेल्या नाहीत. त्यामुळे हिवरखेड मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐवजी थेट नगरपंचायत घोषित करून नगरपंचायतच्या निवडणुका व्हाव्यात. अशी मागणी जागरूक नागरिकांमधून होत आहे.
प्रतिक्रिया
हिवरखेड ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्याने शासनाने ग्रामपंचायत निवडणूक न घेता तात्काळ हिवरखेड नगरपंचायतची घोषणा करावी. अशी आमची मागणी आहे.
धिरज बजाज, सामाजिक कार्यकर्ता, हिवरखेड
20 वर्षांपूर्वी माझ्या कार्यकाळा पासून हिवरखेड नगरपंचायतची मागणी सुरू आहे. कर्तव्यतत्पर आ. अमोल मिटकरी यांच्यामार्फत ती मागणी आता लवकरच पूर्ण व्हावी.
सौ इंदिराताई इंगळे, माजी सरपंच, हिवरखेड