ताज्या घडामोडी
बिबट्याच्या गावात धुमाकूळ:दोन गाईचा पाडला फडशा.

शरद भेंडे / ग्रामीण प्रतिनिधी
सातपुड्याच्या पायथ्याजवळली गाव-शेत शिवारात गत दोन दिवसापासून बिबट्याने घातलेल्या धुमाकूळने लोकांमधे दहशत पसरली असून, दोन गाईंचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना आज सकाळी सकाळी उघडकीस आली. अकोट तालुक्यांतील सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्याला लागून असलेल्या शेतशिवारात दोन दिवसापासून बिबट्या दिसत असून, वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावले . पण तो जाळ्यात अडकला नाही.
याचं परिसरातील खैरखड गावात ही तो दिसून आल्याने गावक-यांमधे दहशत निर्माण झाली. अनेकांनी रात्रीला गस्त दिली परंतू आज एका शिवारातील दोन गाईंचा बिबट्याने फडशा पाडल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.