लोहारा येथील अंगणवाडी समोर घाणीचे साम्राज्य

ग्रामीण प्रतिनिधी/संतोष मोरे
लोहारा
लोहारा :- बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे अंगणवाडी क्रं.६ समोर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. अंगणवाडीच्या बाजुलाच लोहारा ग्रामपंचायत व सरकारी दवाखाना,शाळा आहे.तरीसुद्धा या घाणी कडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे हिच अवस्था सर्व लोहारा गावामध्ये पाहायला मिळेल . नालेसफाई वेळेवर नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी येत आहे व दुसरीकडे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी स्वच्छ भारत मिशन मोहीम राबवित आहे माञ ग्रामीण भागाकडे स्वच्छ भारत मिशन फक्त नावा पुरतेच राहिलेले आहे अशी समज नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.अंगणवाडी क्रं. ६ च्या भिंती वरती एक सुचना दिली आहे तरी सुध्दा तिथे घाण आणुन टाकली जाते.या घाणी मुळे डासांचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे त्यामुळे डेगु, साथीच्या आजाराचा, या सारखा अनेक रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फवारणी होणे आवश्यक आहे नागरी सुविधा अभावी ग्रामस्थ त्रस्त झाले आहे तरी सुध्दा ग्रामपंचायत लोहारा यांनी नागरिकांच्या जीवांशी न खेळता गावातील, सांडपाणी, नालाची सफाई व मुख्य रस्त्यावरील खते यांची गावाबाहेर विल्हेवाट लावावी असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.