ताज्या घडामोडी
स्व.डॉ.वा.रा.कोरपे त्यांचे सहकार क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद – प्रमोद गावंडे

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक सहकार महर्षी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष स्व.डॉ.वा.रा कोरपे यांचे सहकार क्षेत्रात कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा आंदोलने केली.असा विचार अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बाळापूर येथील शाखा व्यवस्थापक प्रमोद गावंडे यांनी व्यक्त केले. डॉ.कोरपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री गावंडे बोलत होते. याप्रसंगी बाळापूर येथील कर्मचारी विनोद मैसने, शिवशंकर बिल्लारी, प्रमोद तेलगोटे, श्रीकांत मसने, शिवलाल मालोकार, आत्माराम नेमाडे, कुमारी दिपाली मुरूमकर, श्रीमती मनीषा भोंडने, राजेश तिवारी,दत्तात्रय वाघ, विशाल नकासकर, प्रामुख्याने हजर होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.