कोरकू मजुरांना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप

साथ सेवक फाउंडेशनचा पुढाकार…
अविनाश पोहरे – संपादक
सध्या सगळीकडे सोयाबीन काढणीची घाई सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना गावातील मजूर पुरेसे नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा झाला अशा परिस्थितीत बाहेरील मजूर गावामध्ये आणून त्यांच्याकडून आपल्या पिकाची काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी “मध्यप्रदेश मधून “कोरकू मजुरांना” आपल्या गावात आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होण्यापासून वाचले आहे. परंतु त्या मजुरांमध्ये covid-19 ची जागरूकता नसल्यामुळे “कोरोना काळात” खबरदारी घेणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन विराहित येथे “साथ सेवक फाउंडेशन” च्या सेवकांनी त्यांना “कोरोना संदर्भात जनजागृती करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी “आर्सेनिक अल्बम 30” चे वाटप “साथ सेवक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अक्षय भाऊराव राऊत यांच्या पुढाकाराने ज्ञानेश्वर राऊत, सतीश राऊत, दिनेश राऊत, यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्तिक राऊत, शाम राऊत, निखिल राऊत, आदी साथ सेवक उपस्थित होते.