नया अंदूरा गावात नियमांचे पालन करून घटस्थापना संपन्न!

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा गावातील आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळातिल अध्यक्ष व उपाध्यक्ष मंडळाचे पुजारी व सदस्य यांनी कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून नया अंदूरा गावातील आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळाने घटस्थापना केली आहे मंडळाचे अध्यक्ष श्री मंगल राजपूत मंडळाचे उपा अध्यक्ष अंकित क-हे( पत्रकार) मंडळाचे पुजारी धीरज राजपूत यांनी आदिशक्ती नवदुर्गा आहे मंडळाच्या समोर विविध प्रकारच्या सुचना व माहिती देण्यात आली आहे . अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची दररोज झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा अधिकारी साहेब जितेंद्र पापडकर यांनी पोलीस स्टेशन मध्ये आदेश जाहीर केले आहे की नवदुर्गा उत्सव मंडळाच्या समोर आरती करतांना जवळपास ५ व्यक्ति असावे तोंडाला रुमाल किंवा मास्क असावे कमीत कमी एक फुट सुरक्षित अंतर ठेवून उभे राहावे अशी माहिती उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नया अंदूरा गावात देण्यात आली आहे त्याचे पालन नया अंदूरा गावातील आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळातिल अध्यक्ष उपा अध्यक्ष यांनी मंडळातिल सदस्यांना व नवदुर्गाच्या दर्शनासाठी आलेल्या भावीक भक्तांना सुचना दिल्या आहेत .आदिशक्ती नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष मंगल राजपूत उपा अध्यक्ष अंकित क-हे( पत्रकार) मंडळाचे पुजारी धीरज राजपूत, मंडळाचे सदस्य प्रतिक देशमुख, निखिल बोळे, निलेश गुप्ता, गिरीष झाडे, गैरव केकाण, अभिषेक चौधरी, विशाल साबे,अभिषेक झाडे, विजय साबे, ऋषिकेश ठोसर, आकाश गुप्ता, अक्षय झाडे, मयूर बरदिया, यांनी आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ नया अंदूरा येथील सदस्य यांनी कोरोनाच्या काळात भावीक भक्तांच्या समोर विविध प्रकारच्या सुचना दिल्या आहेत.दिनांक १७/१०/२०२० रोजी सायंकाळी ७ वाजता नया अंदूरा गावातील आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये नवदुर्गाची घटस्थापना केली आहे त्यावेळी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निंबा अंदूरा बिट जमादार नंदू सुलताने यांच्या मार्गदर्शनाखाली फाळके मेजर यांनी नया अंदूरा गावातील आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये भेट दिली असतांना त्यांना नियमांचे पालन आढळून आले होते.मंडळाचे अध्यक्ष नया अंदूरा गावातील आदिशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये आरतीच्या वेळेवर जवळपास पाच व्यक्तीपेक्षा जास्त लोक नाहीत तोंडाला रुमाल किंवा मास्क असावे एकमेकापासून कमित कमी एक फुट अंतरावर उभे राहावे अशी माहिती मंडळामध्ये दिली आहे.