एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीयंन्ट्स दर्यापूर चे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण

डॉ.संदीप सुशीर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दर्यापूर : शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये इयत्ता पाचवी व आठवी चे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सहा विद्यार्थी सर्वोत्तम गुणाने उत्तीर्ण झाले त्यांनी आपले नाव व आपल्या शाळेचे नाव यशाच्या शिखरावर ती पोहोचविले ,यशस्वीरित्या यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे. सायली मालोकार, हस्तीका पानझाडे, श्रेया पवित्रकार ,श्रेया इंगळे ,आरुष झुणझुणवाला, आदया देशमुख, श्रावणी खेडकर, या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वीरित्या यश संपादन केले व शालेय स्तरावर त्यांचा गुणगौरव करण्यात आला शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री तुषार चव्हाण सर व शिक्षक वृंद कर्मचारी ,शाळेच विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांच कौतुक केलं असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.