ताज्या घडामोडी

पातुर तालुक्यातील मंदिरे उघडी करण्यासाठी भाजपचे उपोषण!

अविनाश एस. पोहरे – संपादक

महाराष्ट्र सरकारने मंदिराऐवजी मदिरालय सुरू केले असून संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मंदिर बंद, बार सुरू असे काळे चित्र निर्माण केले असून आज १३ ऑक्टोबर २०२० ला पातूर तालुक्यातील जांभरून येथील जागृत हनुमान मंदिर समोर भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने विविध संप्रदायांतील साधू-संत व आध्यात्मिक संघटनांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गेले सहा महिने कोरोनाने (Corona) राज्यासह देशातदेखील थैमान घातले आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू  केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बारदेखील सुरू करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत सिनेमागृहेदेखील सुरू करण्यात येतील; मात्र राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवरात्रोत्सवदेखील तोंडावर आला असून राज्यातील साडेतीन शक्तिपीठांचे लाखो भाविक भक्त दर्शन घेत असतात. त्यामुळे होणाऱ्या उलाढालीवर तीर्थक्षेत्रातील व्यापारी व इतर घटकांनादेखील रोजगार उपलब्ध होत असतो. यंदा मात्र कोरोनाचे संकट या उत्सवावर कायम असून व्यापाऱ्यांचा रोष आता वाढत आहे ,म्हणून मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे ,या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा पातूर तालुका अध्यक्ष रमण जैन यांनी केले ,उपस्थित म्हणून विजयसिंह गहिलोत ,चंद्रकांत अंधारे ,राजू उगले ,अभिजीत गहिलोत ,कपिल खरप ,मार्तंडराव मोकळकर ,विनोद लोथे ,विनेश चव्हाण ,मंगेश केकन ,रामभाऊ गोळे ,संजय फाटकर ,भीमराव काळे ,सागर आखरे ,द्न्यानेश्वर जाधव ,सुरेश मुर्तडकर ,बबन डोंगरे ,माणिक ईंगळे ,प्रमोद उगले ,धनंजय पाचपोर ,संतोष शेळके ,सचिन बारोकार ,सचिन बायस ,निलेश बगळेकर ,दिनेश करपे ,सुनील ईंगळे ,प्रकाश लुलेकर ,बाळकृष्ण सरोदे ,गजानन सरोदे ,पुरुषोत्तम नेव्हाल ,विश्वनाथ ताले ,डिगांबर ढाळे ,ओमप्रकाश लखाळे ,धनंजय बदरखे ,कैलास काकर ,अजय राव ,सागर हिरळकार ,द्न्यानेश्वर मानकर ,अनंता राऊत ,सुपडु शाह ,महादेव राऊत,दतात्रेय लुलेकर ,गजानन नावकार ,प्रल्हाद वानखडे ,हरिभाऊ खरडे ,नारायण खरडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: