हाता येथे गाठे फ्राॅक्स लंम्पी रोगाचे लसीकरण

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता
हाता :-बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता अंतर्गत हाता गाव येथील गावातील गुरांना लम्पी आजाराची सुरवात हातात गाव येथील गुरांना होऊ नये म्हणून. व अकोला जिल्ह्यामध्ये गुरांना लम्पी आजाराची सुरवात झाली असतांना पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत सर्व ग्रामीण भागामध्ये गावात लम्पी आजारांवर लसीकरण करण्याची मागणी होत आहे. लम्पी आजाराची सुरवात झाल्याचे लक्षात येताच आपल्या जवळील पशु वैद्यकीय यांच्याशी संपर्क करुन आपल्या गुरांचा उपचार करू घावा .लम्पी आजाराचे गुरांना सुरवात झाली की जवळपास कमीत कमी तिन दिवस उपचार करावा लागतो त्यासाठी किमान एका दिवसात औषधे किंवा तपासणी फी धरून ५०० रूपये खर्च होत आहे तीन दिवसात जवळपास १५०० रूपये खर्च होतो परंतु पशु वैद्यकीय दवाखाना अदुंरा यांच्या अंतर्गत हे लसीकरण अगदी मोफत देण्यात आले . आहे पशुवैद्यकिय अधिकारी यांनी बाळापूर तालुक्यातील हाता येथील गावामध्ये लम्पी आजाराचे गुरांना लसीकरण देण्यासाठी गावात दवंडी देऊन गावातील गुरांना लम्पी आजाराच्या पासुन सुटका करावी अशी मागणी सुध्दा गावातील शेतकर्यांना केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता तातडीने लम्पी आजाराचे थैमान रोखण्याचे कार्य करावे . लम्पी आजाराची सुरवात होताच शेतकऱ्यांनी वैयक्तिक डाॅक्टर साहेब यांना बोलावून तपासणी व लसीकरण करुन घावे. असे आवाहन डाॅ. वाघाळे यांनी हाता येथील शेतकऱ्यांना केले . शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ वाघाडे पशुधन अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना अदुंरा श्रेणी 2 व त्यांचे सहकारी व परिचर विनायक कवळकार डॉ सुभाष सिरसाठ डॉ कुंदन दुतडे डॉ गोपाल निबेकर भिमकिरण दामोदर गौतम दामोदर संजय बावणे विजय खाडे नितीन दामोदर फंदाट चदनगोळे उपस्थित होते