ताज्या घडामोडी

मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात सुधारित आदेश –जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत टप्पाटप्याने सुरु करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सुधारित आदेशानुसार जिल्हयामध्ये 31 ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जारी केला आहे.
31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत पुढील बाबी प्रतिबंधीत राहतील
सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे 31 ऑक्टोबर
पर्यत बंद राहतील, तथापी ऑनलाईन व आंतर शिक्षण यांस मुभा राहील, सर्व प्रकारेची सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाटयगृहे( माल आणि मार्कट कॉम्प्लेक्स सह) प्रेक्षकगृहे, सभागृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील, सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय,खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील.
संपूर्ण जिल्हयामध्ये 15 ऑक्टोबर 2020 पुढील बाबी सुरु राहतील.
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील शाळेमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विद्यार्थाना आंनलाईन शिक्षण तसेच टेली काऊंसलिंग करिता शाळेमध्ये उपस्थित राहता येईल, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य आणि उद्योजगता प्रशिक्षणाला तसेंच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कोशल्य विकास अभियान, केन्द्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देता येईल, उच्च शैक्षणिक संस्थामधील ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण यांना प्राधान्यकृत केलेल्या पध्दतीनुसार वाव देण्यात यावा. विद्या विशारद (Ph.D.) संशोधन करणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था, विज्ञान, स्नातोकोत्तर विद्यार्थी, तंत्रज्ञान प्रवाहातील आवश्यक असलेल्या प्रयोगशाळा व प्रायोगीक काम यांना 15 ऑंक्टोंबर पासून परवानगी अनुज्ञेय राहील, सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालये कोविड- 19 चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आवश्यक त्या उपायोजना सोशल डीस्टंसिंग , सॅनिटायझरचा वापर इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अवलंब करुन सुरु करता येईल, सार्वजनिक उद्याने, बगीचे, पार्क हे मनोरंजनात्मक हेत करिता यापूढे खुले ठेवता येतील, स्थानिक आठवडी बाजार (गुरांच्या बाजारासह) कोरोना संदर्भाने निर्गमित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अवलंब करुन सुरु करता येईल, कंटेटमेंट झोन व्यतिरिक्त वेगवेगळया ठिकाणी लावण्यात येणाऱ्या व्यवसाय प्रदर्शनी ( Busincss fo Busincss Exhibitions) यांना सुरु करण्याकारिता परवानगी अनुज्ञेय राहील.
तरी या आदेशाची कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येवून तो शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: