माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन
राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला, ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत 15 ते 31 ऑक्टोंबर पर्यंत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. यास्पर्धांमध्ये विजेत्याना बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे नियोजन व अमंलबजावणी करण्याच्या दृष्टीने संनियत्रण अधिकारी तसेच कार्यन्वीत अधिकारी यांचे क्षेत्रनिहाय कामे सबंधी आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.
निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा ही शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी महानगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. यामध्ये कोविड 19 च्या संदर्भाने 1 हजार शब्द मर्यादेत निबंधाचा विषय निश्चित करणे, स्पर्धेला प्रेस नोट, वॉट्सॲप व इतर माध्यमातून व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग मिळविणे, आपल्या कार्यालयाच्या ई-मेल आय.डी. वर निबंध प्राप्त करुन घेणे, याकामी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करणे, निबंधाच्या व रांगोळीच्या परीक्षणासाठी आपल्या स्तरावरुन एक समिती गठीत करणे, आदि कार्यवाही करायची आहे.
पोस्टर्स व घोषवाक्य स्पर्धा ही जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद व आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. या स्पर्धेला प्रेस नोट, वॉट्सॲप व इतर माध्यमातून व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देऊन जास्तीत जास्त स्पर्धेकांचा सहभाग मिळविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व वार्ड स्तरावर पोस्टर्स प्राप्त करुन घेणे, तालुकानिहाय आरोग्य अधिकारी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करणे, विविध कला संघाचा सहभाग घेणे, आदि कार्यवाही करावयाची
आहे शॉर्ट फिल्म ही स्पर जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. कोविड 19 च्या संदर्भाने तीन ते सात मिनिटांचा लघुपट स्पर्धा आयोजीत करावी, आपल्या अधिनस्त असलेल्या तांत्रिक अधिका-याची परीक्षण समिती गठीत करावी, निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, शार्ट फिल्म तसेच वॉल पेंटींग इ. स्पर्धांची वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात प्रचार प्रसिध्दी करणे आदि कार्यवाही करावयाची आहे.
वाल पेंटींग स्पर्धा उपमुख्य कार्यकारीअधिकारी(स्वच्छता विभाग), जिल्हा परिषद, महानगरपालिका व सर्व नगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. स्पर्धेची तारीख निश्चित करुन या कार्यालयास कळवावे, व विविध माध्यमातून व्यापक प्रचारप्रसिध्दी करावी, कोविड-19 व स्वच्छतेच्या संदर्भांने जनजागृतीपर वॉल पेंटींग स्पर्धा आयोजीत करुन जास्तीत जास्त स्पर्धेकांना सहभागी करुन घेणे, सदर स्पर्धेचे फोटोग्राफ्स काढावे, आदि कार्यवाही करावयाची आहे.
या सर्व स्पर्धा 15 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात तसेच स्पर्धेबाबत आवश्यक ती कार्यवाही करुन विजेत्या स्पर्धकाची यादी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे. या स्पर्धेकरीता संनियत्रण अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, जिल्हा प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे काम पाहणार आहेत.