ताज्या घडामोडी

दर्यापूर येथे 18 ऑक्टोबर रोजी पावर ऑफ मीडिया व उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने भव्य रोग निदान शिबिर

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

दर्यापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात 18 ऑक्टोबर रोजी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन दर्यापूर तालुका पावर ऑफ मीडिया फाउंडेशन व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे या भव्य शिबिरामध्ये कान,नाक,घसा व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे 18 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत तालुक्यातील नागरिकांना या शिबीराचा लाभ घेता येणार आहे. हे शिबिर नवरात्र उत्सव निमित्ताने तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये तज्ञांकडून शिबिरातील सहभागी नागरिकांची विनामूल्य तपासणी करण्यात येणार आहे शिबिराचे आयोजन करणारी पावर ऑफ मीडिया एक पत्रकार यांची राज्यव्यापी संघटना असून विविध सामाजिक कार्यक्रम संघटनेतर्फे वेळोवेळी आयोजित करण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून या भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या शिबिराचा लाभ दर्यापुर तालुक्यातील जनतेने अवश्य घ्यावा.
असे आवाहन पावर ऑफ मीडियाचे माजी तालुकाप्रमुख अमोल कंटाळे दर्यापूर तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे शहराध्यक्ष सौरभ रहाटे तालुका उपाध्यक्ष धनंजय देशमुख सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: