धनगर समाजाची दर्यापूर तहसील कार्यालयावर धडक
डॉ.संदीप सुशीर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने”ना संघटना, ना सेना,ना नेता, ना पक्ष धनगर आरक्षण हेच आमचे लक्ष” या अजेंडाखाली धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी व व विविध मागण्यां बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी महाराणी अहिल्याबाई होळकर पॉईंट एसटी आगार समोर दर्यापूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून समस्त धनगर समाज बांधव आपल्या प्रमुख मागण्या चे निवेदन सादर करण्याकरिता तहसील कार्यालयावर धडकले असून त्यांच्या मागण्या धनगर समाजाला गेली 73 वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे संविधानामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीची तरतूद असताना सर्वच राजकीय पक्षाच्या सरकारने आतापर्यंत ही मागणी रोखून धरले आहे.तरी ही मागणी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करून धनगर समाजाला एसटी चे सर्टिफिकेट त्वरित मिळावे व महाराष्ट्रामधील मेंढपाळांच्या वरील सातत्याने होत असणारे अन्य व राज्य सरकारने एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्या तरतुदीची अंमलबजावणी त्वरित करावी व धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची तरतूद लागू करूनच मेगा भरती लागू करावे.धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या स्वयम् योजनेबाबत सरकारने अंमलबजावणी करावी.या प्रमुख मागण्या शासन दरबारी त्वरित पाठविण्यात याव्यात.तरी सरकारने या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करून धनगर समाजाची व्यक्तीच्या आरक्षणाची मागणी त्वरित मंजूर करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा.या प्रमुख मागण्यांसाठी नायब तहसीलदार मते मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.
त्यावेळी दर्यापुर तालुक्यातील ज्येष्ठ समाज सेवकांच्या मार्गदर्शनात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप सुशीर अमोल नवलकार दिपक लताड हरिभाऊ नागे गजाननराव पातोंड सदानंदजी नागे खंडोजी पातुर्डे संजय हांडे गजानन माने माणिकराव नागे गोपाळराव नागे प्रदीप पातुर्डे संतोष नवलकार संदीप पातुर्डे बसवंतराव कोगदे प्रवीण पाचपोहे ज्ञानेश्वर गावंडे अतुल नवलकार अनिल घटाळे शेखर पातुर्डे आशिष पातोंड सतीश मालठाणे ऋषिकेश गुरव राम पातोंड सुरेशराव नवलकर शिवम हांडे रुपेश हांडे गोपाल पातुर्डे संतोष सुशिर योगेश पातुर्डे प्रमोद पातुर्डे संजय पातुर्डे रामदास पातुर्डे नंदकिशोर कोगदे दिगंबर नवलकार अंकुश गावंडे उमेश नागे गणेश कात्रे चेतन पाचपोहे सतीश अघडते गंगाधर साबे संतोष पावडे गोपाल नवलकर सह दर्यापुर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करून उपस्थिती दर्शविली.











