इंटरनेट अभावी नया अंदूरा गावातील मोबाइल फोन बंद अवस्थेत पडले
अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा गावात निंबा फाटा येथील अकोट मार्गावरील जिअो मोबाइल टॉवर दिनांक १६/१०/२०२० रोजी सायंकाळी ४ वाजेपासून बंद अवस्थेत पडल्याने नया अंदूरा गावातील जिअो सिम कार्ड धारक व मोबाइल धारक नाराजी व्यक्त करीत आहेत नया अंदूरा गावात कवरेज नसल्याच्या बातम्या वेळोवेळी प्रकाशीत करण्यात आल्याने नया अंदूरा गावातील जिअो टाॅवर मंजूर करण्यात आले तरी अजूनही काम सुरू करण्यात आले नाही आॅनलाईन शिक्षणाचा जिअो टाॅवर मुळे होत आहे विध्यार्थ्यांनंचा खेळखंडोबा कोरोना व्हायरसच्या मारामारीत शाळा महाविद्यालय बंद असल्याने आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे परंतु निंबा फाटा येथील जिअो टाॅवर बंद अवस्थेत पडत असल्याने नया अंदूरा गावातील आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनंच्या सह मोबाइल फोन धारक संतप्त झाले होते निंबा फाटा येथील अकोट मार्गावरील जिअो टाॅवर लवकरात लवकर चालू करावे नाहीतर नवीन जिअो टाॅवरची उभारणी करावी दिनांक १६/१०/२०२० रोजी सायंकाळी ४ वाजेपासून निंबा फाटा येथील जिअो मोबाइल टॉवर बंद पडल्याने नया अंदूरा गावातील ९०% टक्के जिअो सिम कार्ड बंद अवस्थेत पडले होते त्यामुळे मोबाइल फोन दिखावा झाले होते त्यामुळे नया अंदूरा गावासाठी मंजूर झालेले जिअो मोबाइल टॉवरची लवकरात लवकर उभारणी करून नया अंदूरा गावातील जिअो सिम के धारकांचा व मोबाइल धारकांचा आर्थिक त्रास दूर होणार आहे .











