ताज्या घडामोडी

नियमांचे पालन करून नवदुर्गा उत्सव साजरा करा व शासनाला सहकार्य करा

अंकित क-हे

ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापूर तालुक्यातील ग्रम नया अंदूरा, कारंजा (रम), हाता, अंदूरा, हातरूण ,शिंगोली, कवठा, बाहादूरा, निंबा, निंबी,नागद, सागद, मोखा, वझेगाव, काझिखेड, उरळ मोरगाव सादीजन, गायेगाव, निमकर्दा,मोरझाळी, सावरपाटी, या गावातील सर्व सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातिल अध्यक्ष व सदस्य यांनी आपल्या परिसरातील उरळ पोलीस स्टेशनची परवांनगी घेऊन नियम पाळून उरळ पोलीस स्टेशनला सहकार्य करावे संपूर्ण देशात कोरोनाचे आर्थिक संकट उभे असल्यानंतर कोरोनाच्या सुरूवातीला गणेशाचे आगमन झाले होते तेव्हा शासनाने व पोलीस प्रशासनाने गणेशाचे उंची ठरवून दिलेली होती व नियम कडक होते म्हणून आता दिनांक १७/१०/२०२० रोजी नवदुर्गाची स्थापना होणार आहे तरी उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील नवदुर्गा उत्सव मंडळातिल अध्यक्ष व सदस्य यांनी उरळ पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील पोलीस अधिकारी यांच्या कडून परवांनगी फाॅम घेऊन आॅनलाईन परवांनगी काढावी आॅनलाईन परवांनगी काढण्यासाठी फाॅम दिनांक १६/१०/२०२० पर्यंत उपलब्ध आहे तरी बाकी राहीलेल्या सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातिल अध्यक्ष व सदस्य यांनी तातडीने उरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन परवांनगी मंजूर करावी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण दिवसांना दिवस वाढत असल्याने अकोला जिल्ह्यातील नवदुर्गा उत्सव मंडळांना पुढील प्रमाणे परवांनगी आहे (१) नवदुर्गा उत्सव मंडळाच्या समोर आरती करीता जवळपास पाच व्यक्ति पेक्षा जास्त नसावे (२)तोंडाला रुमाल किंवा मास्क असावे (३) नवदुर्गा उत्सव मंडळाच्या समोर सुरूशित अंतराची आखणी करावी (४) आरती कींवा नवदुर्गा उत्सव मंडळाच्या समोर आलेल्यांनी १ मिटर अंतर ठेवावे(५) नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये साऊंड सिस्टीम बंद राहणार आहे (६) साऊंड सिस्टीम चालू केल्यास जप्त केले जाणार (७) मंडळामध्ये गैरवापर केल्यास तो गैरवापर पोलीसांच्या नजरेत आल्यास कारवाई करण्यात येणार आहे(८) नवदुर्गा उत्सव मंडळाची परवांनगी नसल्यास व नियम मोडल्यास कारवाई व कलम लागू करण्यात येणार आहे (९) नवदुर्गाची उंची ५ फुटांच्या पर्यंत असावी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना सुध्दा देण्यात आल्या आहेत.ग्रामीण भागात नियमांचे पालन करून नवदुर्गा उत्सव साजरा करावा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी व लवकरात लवकर उरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परवांनगी घ्यावी परवांनगी व पोलीस स्टेशनला सहकार्य करावे अशी मागणी उरळ पोलीसांनी केले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: