ताज्या घडामोडी

शिर्ला शेत शिवारात प्रस्तावित पेट्रोल पंप ला ग्रामस्थांसह शेतकरी संघर्ष संघटनेचा विरोध

शेतकरी संघर्ष संघटना अकोला – अध्यक्ष सचिन इंगळे

शेतकरी संघर्ष संघटना अकोला जण आंदोलनाच्या स्थितीत

अविनाश एस. पोहरे – संपादक

पातूर (शिर्ला) सविस्तर शिर्ला शेत शिवारात नॅशनल हायवे कन्ट्रक्शन कंपनी ने येथील शेतकऱ्यांची जवळ पास ६० एकर जमीन भाडे तत्वावर घेतली आहे. त्यामध्ये वर्कर हाऊस,गोडाऊन,व्हाइकल स्टॅन्ड, क्रशर डेपो,आणि पेट्रोल पंप निर्मानाधीन आहेत पण प्रत्येक्षात या जमिनी मध्ये खोद काम केले असता केवळ 2 फुटावर हार्ड मुरूम (खडक ) लागतो त्यामुळे पेट्रोल पंप टाकी या जमिनीमध्ये टाकणे उचित होणार नाही त्याच बरोबर याच शेत शिवारातून M. A. C. B. ची हायपर टेन्शन टॉवर लाईन गेलेली आहे. या शेत शिवरापासून जवळच शिर्ला येथील मूर्तिकार मुर्त्या बनविण्या साठी लागणारा दगड खदान परिसरातून ब्लास्टिंग करून काढतात. आणि या लोकांचा हा बारमाही व्यवसाय असल्या कारणाने भविष्यात यांच्या या पेट्रोल पंप मुळे व्यवसाय वर गदा येऊ शकते त्यामुळे या पेट्रोल पंपास नागरिकांचा विरोध होत आहे. शेतकरी संघर्ष संघटना अकोला जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष श्री सचिन इंगळे यांनी या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामपंचायत शिर्ला गटविकास अधिकारी पंचायत समिती पातूर यांच्या कडे लेखी तक्रार दि. 15/10/2020 ला केली आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास संघटना जणअंदोलन च्या स्थितीत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: