ताज्या घडामोडी
हस्ताच्या पावसाने कापूस व तूर पीकही धोक्यात, शेतकरी हतबल
शेषराव बेलुरकर/ प्रतिनिधी कवठा
हस्त नक्षत्रात पाऊस हा अशी शेतकरीवर्गाची पुर्वपार चालत असलेली धारणा आहे त्यामुळे पडेल हस्त शेतकरी मस्त अशी धारणा आहे परंतू १२ तारखेला आलेल्या पावसाने कवठा परिसरातील तुर कापूस सोयाबीन ही पिके धोक्यात आली आहे या आधी मुंग उडीद पीक पुर्णपणे शेतकर्यांच्या हातातून गेले आहे तर आता परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापूस हि पिके सडण्याच्या मार्गावर आहेत तर तुर या पीकावर बुरशी मर या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे कापूस तुर उत्पादन शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कवठा बहादुरा डोंगरगाव कांरजा नया अंदुरा लोहारा या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











