हिवरखेड तेल्हारा मार्गावर ट्रक पलटी
विकास महर्षींचा विकास गेला तरी कोठे?? नागरिकांचा सवाल
संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
हिवरखेड- तेल्हारा- आडसुल आणि हिवरखेड- वारखेड हे दोन्ही राज्यमार्ग नूतनीकरणासाठी गेल्या कित्तेक महिन्या पासून खोदकाम करुन ठेवलेले असून या रोडवर बरेचशे अपघात झालेले आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहेत.हिवरखेड येथील भाऊदेवराव गिऱ्हे नगर (इंदिरा नगर) जवळ हिवरखेड- तेल्हारा- आडसुल राज्यमार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे आणि राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली असल्यामुळे तेथे केळीने भरलेला ट्रक पलटी होऊन त्यात 3 जण किरकोळ जखमी झाले.
हिवरखेड येथून ट्रक क्र UP 62 AT 3743 हा उत्तर प्रदेशात केळीने भरून जात होता. महाकाय खड्ड्यात झकोला येऊन केळी भरलेला ट्रक जागीच पलटी झाला. परंतु सुदैवाने जीवित हानी टळली. सदर घटना राहत्या वस्ती समोरच घडल्याने तेथे अनेक मुले खेळत होती लहान मुलांच्या अंगावर सदर ट्रक कोसळला असता तर मोठी जीवित हानी घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु मुले खेळत असलेल्या ठिकाणाहून थोड्याच अंतरावर सदर ट्रक पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला. घटना घडताच मदतीसाठी अनेकांनी येथे धाव घेतली. आणि जखमींना उपचारार्थ हलविले. तर बघ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. हिवरखेड येथील दोन्ही राज्य मार्गांची प्रचंड दुरावस्था आणि महाकाय खड्ड्यांमुळे कथित स्वरूपाच्या जागतिक दर्जाच्या खोट्या विकासाची अनुभूती नागरिकांना येत असून विकास महर्षी ने केलेला तथाकथित विकास गेला तरी कुठे? आणि खराब रस्त्यामुळे हिवरखेड तेल्हारा तसेच हिवरखेड वारखेड रोडवर बरेच अपघात झालेले असून याला जवाबदार कोन असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.











