शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन
नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) आणि बाळापुर तालुका काँग्रेस कमिटी (ग्रामीण आणि शहर) च्या वतीने हुकूमशाही केंद्र सरकार विरुद्ध एल्गार करण्यासाठी,शेतकरी बचाव डिजिटल रॅली चे आयोजन जिल्हा परिषद सदस्य वाडेगाव सर्कल मा.श्री चंद्रशेखर दौलतराव चिंचोळकर यांच्या नेतृत्वात वाडेगाव येथे दिनांक 15 ऑक्टोबरला करण्यात आले.केंद्र सरकार कडून करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांना महाराष्ट्रात अडवण्याचा निर्धार यावेळी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा श्री चंद्रशेखर चिंचोळकर, मा श्री डॉ हिम्मतराव घाटोळ, मा श्री डॉ जगदीश चिंचोळकर, मा नंदकिशोर चिंचोळकर,गजाननराव शेगोकार, राजूसिंग जाधव, राजकुमार अवचार,सुश्रुत भुस्कुटे, सचिन धनोकार, सतपालसिंग ठाकूर, सुधाकरराव नावकार, सतीश धनोकार, व समस्त गावकरी मंडळी शेतकरी मंडळी उपस्थित होती.











