पिंप्री खुर्द परीसरात ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत
शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिंप्रि खुर्द
परतीच्या पावसामुळे सोयाबीन ज्वारी कापसाची नासाडी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे अशातच गत तिन चार दिवसांपासून असलेल्या वातावरणामुळे तुरीवर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे या परीसरात रविवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे सोयाबीन.ज्वारी.कपाशी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे त्यानंतर गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग वर्तविली आहे वातावरणातील बदलांचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतो यंदा मृग नक्षत्रात साधारण कारक पाउस झाल्यावर या परीसरात दुबार पेरणी केली विविध पिकांसह कापूस बियाण्याची पेरणी केली पेरणी झाल्यावर पावसाने विश्रांती घेतली घेतल्याने पिकांना फटका बसला त्यानंतर मुग उडीद पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने पिक हातचे गेले सधस्थितीत या परीसरात दोन दिवस दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.











