ताज्या घडामोडी
पंचगव्हाण फाटा येथे ट्रकची चहा टपरीला धडक : तिन गंभीर
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण फाटा येथे कापसाच्या गाठी घेऊन शेगांव कडे जाणारा एक ट्रकने पंचगव्हाण फाटा येथे चहा च्या दुकानाला धडक दिली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अकोट वरुन शेगांव कडे जाणारा दहा चाकी ट्रक फाट्यावर चहाच्या टपरीवर धडकला यामध्ये प्रल्हाद अंभोरे रा.देवर्डा उषा प्रल्हाद अंभोरे.रखमा राजु अंभोरे हे तिघे गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हालविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











