निंबागाव येथे गाटे-फ्राॅक्स लंम्पी रोगाचे लसीकरण
ग्रामीण प्रतिनिधी / संतोष मोरे
निंबागाव :-बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबागाव अंतर्गत निंबागाव येथील गावातील गुरांना लम्पी आजाराची सुरवात निंबागाव येथील गुरांना होऊ नये म्हणून. व अकोला जिल्ह्यामध्ये गुरांना लम्पी आजाराची सुरवात झाली असतांना पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत सर्व ग्रामीण भागामध्ये गावात लम्पी आजारांवर लसीकरण करण्याची मागणी होत आहे. लम्पी आजाराची सुरवात झाल्याचे लक्षात येताच आपल्या जोडली पशु वैद्यकीय यांच्याशी संपर्क करुन आपल्या गुरांचा उपचार करू घावा .लम्पी आजाराचे गुरांना सुरवात झाली की जवळपास कमीत कमी तिन दिवस उपचार करावा लागतो त्यासाठी किमान एका दिवसात मेडिसिन किंवा तपासणी फ्री धरून ५०० रूपये खर्च होत आहे तीन दिवसात जवळपास १५०० रूपये खर्च होतो परंतु पशु वैद्यकीय दवाखाना निंबागाव यांच्या अंतर्गत हे लसीकरण अगदी मोफत देण्यात आले . आहे पशुवैद्यकिय अधिकारी यांनी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील गावामध्ये लम्पी आजाराचे गुरांना लसीकरण देण्यासाठी गावात दवंडी देऊन गावातील गुरांना लम्पी आजाराच्या पासुन सुटका करावी अशी मागणी सुध्दा गावातील शेतकर्यांना केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता तातडीने लम्पी आजाराचे थैमान रोखण्याचे कार्य करावे . लम्पी आजाराची सुरवात होताच शेतकऱ्यांनी वयक्तिक डाॅक्टर साहेब यांना बोलावून तपासणी व लसीकरण करुन घावे. असे आवाहन डाॅ. सुनिल मारेखडे यांनी लोहारा येथील शेतकऱ्यांना केले . लसीकरण करता वेळी डाॅ. सुनिल मारेखडे, डाॅ.सिरसाट, डाॅ. दुतोंडे, प्रसाद मारेखडे व निंबागाव येथील शेतकरी रंजित वानखडे, माजी सरपंच नागेश तायडे, सुभाष तायडे व शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











