व्यायाम शाळेच्या अभावी नया अंदूरा गावातील युवक महामार्गावर भरत आहेत व्यायाम शाळा
अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा गावातील युवकांनी इंडियन आर्मी मध्ये जाॅइन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्या अनुषंगाने बाळापूर तालूक्यातील आमदार नितीन देशमुख यांनी नया अंदूरा गावात त्यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करून नया अंदूरा गावातील युवकांना व्याम शाळा मंजूर केली होती परंतु अद्यापही व्याम शाळा उभारण्यात आली नाही व व्याम शाळेचे साहीत्य आले नाही निंबा फाटा ते अकोट महामार्ग न्याशनल महामार्ग झाला आहे त्या रोडवर नया अंदूरा गावातील जवळपास ५० मुले दररोज पाहटे ५वाजेपासून मध्य रोडवर व्याम करीत आहेत या मार्गावरून हजारो वाहने भरधाव वेगाने वाहतूक करीत असतांना एखाद्या दिवशी जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नया अंदूरा गावातील युवक दररोज जवळपास कारंजा (रम) ते निंबा फाटा पर्यंत रनिंग करीत जात असतात नंतर कारंजा (रम) रोडवर व्याम शाळा भरवतात जवळपास पाच सहा महिन्यापासून नया अंदूरा गावातील युवकांनी बाळापूर तालूक्यातील आमदार नितीन देशमुख यांच्या कडे नया अंदूरा गावात व्याम शाळा मागितली होती परंतु आमदार नितीन देशमुख यांनी नया अंदूरा गावातील युवकांची मागणी मान्य करून त्यांना नया अंदूरा गावात व्याम शाळा मंजूर केलेल्या अवस्थेत असतांना नया अंदूरा गावापर्यंत अजूनही पोहचू शकली नाही त्याचे कारण काय असावे असा प्रश्न नया अंदूरा गावातील युवकांना पडला आहे निंबा फाटा ते कारंजा (रम) महामार्गावर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने वाहतूक चालू असतांना ये-जा करणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरू असते तेव्हा सुध्दा रोडवर नया अंदूरा गावातील युवकांची गर्दी असते त्यामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पहले काही दिवस गावातील जून्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या खोलीत व्याम शाळा म्हणून व्याम चालू असत परंतु नया अंदूरा गावातील जून्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची इमारत शिकस्त झालेल्या अवस्थेत आहे म्हणून नया अंदूरा गावातील युवकांना व्याम करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना प्रश्न उपस्थित झाला आहे बाळापूर तालूक्यातील आमदार नितीन देशमुख यांनी लवकरात लवकर व्याम शाळा मंजूर करून नया अंदूरा गावातील युवकांचा व्याम शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करावा आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून लवकरात लवकर नया अंदूरा गावातील मंजूर झालेली व्याम शाळा मंजूर करून उदघाटन करून व्याम शाळा सुरू करावी अशी मागणी नया अंदूरा गावातील युवकांनी आमदार नितीन देशमुख यांच्या कडे व्यक्त केली आहे











