ताज्या घडामोडी

धनगर एसटी आरक्षणसाठी दर्यापूरातील धनगर पुत्र सज्ज !तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दि.13 ऑक्टोबर

दर्यापूर: महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती जमाती सुधारणा आदेशाची 1956 व 1976 अनुसूचित जमातीच्या अनुसूचीप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या एक ते दीड कोटी असून हा समाज स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही मागासलेला होता व आहे या समाजाला पारंपरिक व्यवसाय शेळी व मेंढी पालनाचा तसेच घोंगळी विणण्याचा असून त्याचप्रमाणे समाजातील काही लोक आजही शेतमजुरी व शेतीचा व्यवसाय करतात या समाजात शिक्षणाचा अभाव असून स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण 2% आहे तसेच पुरुषांचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळे हा समाज आर्थिक सामाजिक राजकीय व शारीरिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आतापर्यंत या समाजातील महाराष्ट्रत एकही व्यक्ती लोकसभा सदस्य नाही त्यामुळे राजकीय क्षेत्रात हा समाज विज्ञान वासात वावरत नाही.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा मागासलेल्या समाजाला घटनेच्या कलम 340 341 342 अन्वय काही सोयी-सवलती दिल्या आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती आदेश महाराष्ट्र राज्यातील धनगर ही जमाती अर्वाचीन काळापासून शैक्षणिक राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या अजूनही मागासलेली असून त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे धनगर समाजावर अन्याय झालेला आहे तो त्वरित दूर करण्यात यावा तसेच अनुसूचित जाती आदेश क्रमांक 36 वर ज्याप्रमाणे बिहार ओरिसा व झारखंड या राज्यात मध्ये सन 2002 मध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे धनगड या शब्दाऐवजी धनगर असा बदल करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला ताबडतोब शिफारस करावी. धनगर समाजाच्या निवेदनाचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा व धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न ताबडतोब निकाली काढावा.अशा मागणीचे निवेदन दर्यापूर तालुक्यातील समस्त धनगर पुत्रांच्या वतीने तहसीलदार डॉ.योगेश देशमुख तहसील कार्यालय दर्यापूर यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी कपिल घुरडे अंकित लामसे तसेच समस्त धनगर समाजातील नवयुवक तरुण व धनगर समाज बांधव शासनाच्या नियमांचे पालन करीत उपस्थित होते,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: