ताज्या घडामोडी

झरी येथे सहा गाई बेवारस

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांना गुप्त माहिती मिळाली की ग्राम दिवानझरी शिवारात अंगणवाडीचे बाजूला तीन गाई आणि तीन वासरू बेवारस अवस्थेत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पीएसआय वाणी आणि त्यांच्या पथकाने दिवाण झरी येथे घटनास्थळावर पाहणी केली असता तीन मोठ्या गायी आणि तीन वासरी किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये ह्या बेवारस अवस्थेत पोलिसांना मिळून आल्या. सदर गाईंना पोलिसांनी ताब्यात घेऊन देखभालीसाठी गोरक्षण संस्थान आकोट येथे पाठविल्या. सदर जनावरांचे मालकांचा शोध पोलीस विभाग घेत आहेत सदर गाई कोणाच्या मालकीची असल्यास त्यांनी योग्य कागदपत्रासह हिवरखेड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: