आशिया खंडातील देशात शैक्षणिक वैद्यकीय व्यवस्था भारतासारखीच

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
आशिया खंडातील चीन, रशिया, ताजकिस्थान,अर्मेनिया, जॉर्जिया, मोल्डोवा, युक्रेन,किर्गिस्थान,फिलिपीन्स,बेलारूस आदी देशातील एमबीबीएस, एमडीएस, एमडी, बीडीएस आदी वैद्यकीय शिक्षण हे पाश्चात्य राष्ट्र व भारतापेक्षा अत्यंत स्वस्त व सुलभ आहे.तरअमेरिका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड देशातील वैद्यकीय शिक्षण हे महाग व खर्चिक आहे.म्हणून पालकांचा कल आपल्या पाल्यांना भारतापेक्षा ही कमी खर्च लागणाऱ्या आशिया खंडातील अश्या राष्ट्रात वैद्यकीय शिक्षण देण्याचा असतो.म्हणून डॉक्टर होण्याची स्वप्न बघणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांनी या देशातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन सफल डॉक्टर होण्याचे आवाहन सीए सोहराब खान यांनी केले. गत पंधरा वर्षांपासून आशिया खंडातील अनेक राष्ट्रात वैद्यकीय विद्यार्थी घडविणाऱ्या नागपूरच्या युनायटेड स्टडीज अब्रोड कंसलटंटचे रविवारी महानगरात विदेशातील वैद्यकीय शिक्षण व संधी यावर चर्चासत्र संपन्न झाले.या चर्चासत्रात पालक व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेत आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी व आपल्या दोन्ही मुली अश्या राष्ट्रात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवून त्यांना घडविणारे यशस्वी पालक एड.अनंत खेडकर,या संस्थेच्या महानगरातील समुपदेशक एड.जयश्री मानखैर आदी मान्यवर उपस्थित होते. सीए खान यांनी पॉवर पॉइंट द्वारे आशिया खंडातील या वैद्यकीय शिक्षणाची तांत्रिक माहिती व पद्धत अत्यंत सोप्या भाषेत सांगितली.ते म्हणाले,वैद्यकीय शाखेकडे वळू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न आशिया खंडातील भारतासारखीच शैक्षणिक व्यवस्था असणाऱ्या रशिया,चीन, फिलीफिन,किरकिस्थान,युक्रेन,जॉर्जिया सारख्या देशातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन पूर्ण करता येते.उलट अमेरिका,ऑस्ट्रेलिया सारख्या पश्चिमात्य देशातील वैद्यकीय शिक्षण हे फार महाग असून तेथे यासाठी अनेक क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागुन नीट सारखी असणारी तेथील प्रवेश चाचणी पास व्हावी लागते.आशिया खंडातील वरील देशातील वैद्यकीय महाविद्यालये ही शासकीय असल्यामुळे कमी फी मध्ये तेथे डॉक्टर होता येते.या पदव्या भारतातील इतर वैद्यकीय पदवी सारखीच असून याला भारतीय वैद्यक परिषद,जागतिक आरोग्य संघटना, सीएचइडी सारख्या सर्वोच्च संस्थांची मान्यता असल्याचे सांगण्यात आले.या वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सरळ आहे.इयत्ता दहावीची गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र, इयत्ता बारावीचे पन्नास टक्के पर्यंत गुण असणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी या प्रवेश प्रक्रियेला पात्र असून युवक व युवतींनी हे प्रमाणपत्र,दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचे प्रमाणपत्र आदीं आवश्यक कागदपत्रे संस्था संकलित करून पुढील प्रोसेस प्रारम्भ करते.यात विद्यार्थ्यांना आवडती परदेशातील वैद्यकीय महाविद्यालये, पासपोर्ट,विजा,विमान तिकीट,परदेशी चलन,विद्यार्थी वसतिगृह उपलब्ध करून तेथील विविध वैद्यकीय विद्यापीठांशी संपर्क करीत प्रवेश मिळवून देते.प्रवेश प्रक्रिये दरम्यान निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रस्थान पूर्व संमेलन घेण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना,निर्देश व प्रात्यक्षिक सादर करण्यात येते.तसेच अनेक वेळा विद्यार्थी राहत असलेल्या परदेशातील विद्यापीठ व वसतिगृहांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात येत असल्याचे सीए खान यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी एड सौ.जयश्री मानखैर,फ्लॅट न.17 महालक्ष्मी अपार्टमेंट, जठारपेठ,अकोला मो.9309537509 अथवा रुक्मिणी ठाकूर,मो.7447324451,9960246568 युनायटेड स्टडीज अब्रोड कंसलटंट,नागपूर येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी एड.खेळकर यांनी आपल्या काव्यात्मक वाणीतून आपले मनोगत विशद करीत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या श्रमाचे चीज करीत अत्यंत मेहनत,जिद्द चिकाटीने वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून कुटुंबाला आधार देण्याचे आवाहन करीत आपल्या मुलींनी स्व कर्तृत्वावर आशियाई देशांतील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा बहुमान प्राप्त केला.म्हणून मुलींनी कमी गुण मिळाले व डॉक्टर होण्यासाठी निधी नाही ही भीती मनातून काढून विदेशातील वैद्यकीय शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले.यावेळी चीन, किंगिस्थान आदीं देशात वैद्यकीय शिक्षण घेत असणाऱ्या विदयार्थीनी कु. ऋतुजा,अब्दुल,मंथन आदींनी आपले शैक्षणिक अनुभव कथन केले. आशिया खंडातील देशात बाहेर राष्ट्रातून आलेल्या मुलींबद्दल विशेष सुरक्षा घेण्यात येत असते.अगदी आपण आपल्या देशात जणू शिकतो अशी प्रचिती तेथे येऊन मुलींनी न घाबरता परदेशात शिकले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करीत युनायटेड स्टडीजच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल संयोजकांचे आभार मानले.प्रस्ताविक एड. सौ.जयश्री मानखैर यांनी करून विदेशात विद्यार्थ्यांनी कसे वैद्यकीय शिक्षण घ्यावे याची माहिती दिली.विदेशी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती सांगून होतकरू विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक कर्ज बॅंका मार्फत दिल्या जाते.त्यासाठी संस्था विद्यार्थ्यास सर्वोतोपरी सहकार्य करीत असल्याचे सांगितले.या चर्चासत्राचे आभार एड.जयश्री मानखैर यांनी केले.या चर्चासत्रात संस्थे च्या दिव्या कात्रे,समुपदेशक रुकसना अन्सारी आदींनी मेहनत घेतली.