ग्रामीण भागातील मुर्तीकारांवर आर्थिक संकट

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील ग्रामीण भागातील मुर्तीकारांवर कोरोनाचे आर्थिक संकट उभे राहिले आहे संपूर्ण देशात कोरोनाचे आर्थिक संकट उभे असतांना मुर्तीकारांवर कोरोनाने त्यांच्या व्यवसायात घट झाल्याची माहिती समोर आली आहे मार्च महिन्यापासून सर्व व्यवहार व्यवसाय सर्व बंद होते परंतु लवकर काही व्यवसाय सुरू करण्यात आले होते परंतु मुर्तीकारांचे कोणतेही व्यवसाय सुरू करण्यात आले नव्हते त्यामुळे गणेश चतुर्थीच्या वेळेस गणेशाची मुर्ती केवळ ४ फुट बनवण्यासाठी मुर्तीकारांना परवानगी दिली होती परंतु दिनांक १७/१०/२०२० घटस्थापना होत आहे आणि शासनाने त्यांना कमीतकमी देवीची मुर्ती ४ फुट असने बंधनकारक आहे सर्व मुर्तीकारांनी ४ फुटाच्या मुर्त्या बनवल्या आहेत परंतु ग्रामीण भागात एकदम मुर्ती लहान दिसत असतांना सार्वजनिक मंडळाची नाराजी व्यक्त केली आहे कोणत्याही मुर्तीकारांना शासनाच्या कडून आर्थिक मदत किंवा पॅकेज नसतांना सुध्दा अल्पदरात मुर्त्या विक्री करीत आहेत त्यांना शासनाने तातडीने कोरानाच्या माहामारीत मुर्तीकारांना आर्थिक मदत जाहीर करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी होत आहे,अंदूरा गावातील मुर्तीकार अमर बोरवार आम्हाला आतापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत कींवा पॅकेज जाहीर केले नाही किंवा आमच्या पर्यंत पोहचले नाही व आम्हाला मुर्त्यांची उंची किमी कमी करत असतांना सार्वजनिक मंडळांची नाराजी असल्याने आम्ही बनवलेल्या मुर्त्या कोण विकत घेणार असा प्रश्न ग्रामीण भागातील मुर्तीकारांना पडला आहे अमर बोरवार मुर्तीकार अंदूरा (जूना)