देशातील मागासवर्गीयांवरील अन्यायअत्याचार थांबविण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा देणार आक्रोश निवेदन

डॉ. संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दर्यापूर : देशात व राज्यात मागासवर्गीयांवर( बौद्ध, SC, ST, VJ, NT, OBC) समाजावर विविध प्रकारचे अन्याय,अत्याचार दिवसागणिक वाढतच आहेत. अनु.जाती,अनु.जमाती मधील अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नतीमधील आरक्षण 2017 पासून रखडले असून हजारो अधीकारी, कर्मचारी पदोन्नती पासून वंचित आहेत.मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी सेवा जेष्ठ असूनही त्यांना खुल्या प्रवर्गतही पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात येत आहे.राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला उत्पन्नाची अट लावण्यात आली आहे. केंद्रीय अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक वगळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे.नविन शैक्षणिक धोरणामध्ये आरक्षण आदी मागण्यासाठी मा.भिमराव आंबेडकर यांच्या निर्देशानुसार भारतीय बौद्ध महासभा, अमरावती जिल्हा (पश्चिम ) च्या वतीने *महामहिम राष्ट्रपती , मा.पंतप्रधान ,भारत सरकार ,मा.राज्यपाल , मा. मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य व दर्यापूर विधान सभा मतदार संघाचे आमदार मा.बळवंतराव वानखडे यांना मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर, 2020 रोजी आक्रोश निवेदन देन्यात येणार आहे.याचं वेळी उत्तरप्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय तरुणी मनिषा वाल्मिकी हिच्या वरील अमानुष अत्त्याचाराबाबतही महामहिम राष्ट्रपती , भारत सरकार यांना निवेदन देण्यात येणार आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष, विजयकुमार चौरपगार, भा.बौ.महासभा अमरावती जिल्हा (पश्चिम) चे जिल्हाध्यक्ष, संजय मोहने जिल्हासरचिटणीस, सतीश इंगोले, याशिवाय जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच रिपब्लिकन सेनेचे संजय चौरपगार, वंचित बहूजन आघाडीचे साहेबराव वाकपंजार , सम्यक विदयार्थी आंदोलनाचे अंकुश वाकपंजार, तसेच अन्यायाविरुद्ध सतत लढणारे विविध संघटनांचे लढाऊ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर निवेदन देण्यासाठी दर्यापूर तालुक्यातीलअन्याया विरुद्ध लढणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांनी मंगळवार दि.13 ऑक्टोबर, 2020 रोजी दुपारी 12. 00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, दर्यापूर परिसरात एकत्रित व्हावे अशी विनंती एकापत्रकांद्वारे भा.बौ. महासभेचे प्रा.डॉ.डी.आर.बांबोळे एम.पी. नीताळे, प्रा.देवराव चक्रे लक्ष्मीबाई सराटे,माधुरी ताई चौरपगार, मुरलीधर रायबोर्डे, मधुकरराव चौरपगार, अरुण रायबोले , गोवर्धन जामाणिक आदींनी केली आहे.