ताज्या घडामोडी

डेंगू सदृश आजाराचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव.

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला- संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट कायम आहे आणि सर्वत्र यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते आहे आणि त्यातच आता जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वत्र डेंगू सदृश्य आजाराचे नवीन संकट निर्माण झाले आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.कोविड १९ कोरोना महामारीमुळे आधीच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे आणि त्यात ही नवीन समस्या उद्भवल्यामुळे डेंगू या आजाराबाबत उपाय योजना झाली नाही तर तो ताण अजून वाढेल आणि यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हागणदारी मुक्त ग्राम योजनेची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे आणि त्वरीत प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे बंधनकारक आहे ह्याबाबत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना तसे आदेश देऊन त्वरित उपाययोजना करण्याचे पत्रक काढावे अशी मागणी आज भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन भाजप युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.यावेळी
जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे, प्रवीण डिक्कर,जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पवन बुटे,अक्षय जोशी,अकोट तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष अजय खडसान,भाजपा पातूर तालुका सरचिटणीस कपिल खरप,रामेश्वर पाटील व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: