साथ सेवक पवन मंगळे यांनी “सूर्योदय बालगृहाला” फॅन भेट देऊन केला वाढदिवस साजरा.

अविनाश पोहरे – संपादक
समाजामध्ये वयात आलेली तरुणाई केक कापून, धाब्यावर पार्टीत रंगून वाढदिवस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या सर्व बाबीवर अंकुश ठेऊन, वाढदिवशी आपण काय केले पाहिजे, वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे याचे आदर्श उदाहरण “साथ सेवक फाउंडेशन चे साथ सेवक पवन मंगळे” यांनी ठेवले.सूर्योदय बालगृह अकोला येथे जाऊन त्यांना आवश्यक असणारे दोन सिलिंग फॅन साथ सेवक फाउंडेशन च्या कडून भेट देण्यात आली.देशातील युवकांनी आपला जन्मदिवस सामाजिक बांधिलकी जपत व समाजाला आपलं काही देणं लागत या विचारांनी साजरा करावा असे मत साथ सेवक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.अक्षय राऊत यांनी व्यक्त केले. तेव्हा मा.शिवराज पाटील, मा.प्रशांत देशमुख, साथ सेवक सौरभ नेवारे, साथ सेवक फाउंडेशन चे कोषाध्यक्ष मा.शुभम पौळ, साथ सेवक फाउंडेशन चे सचिव मा.अंकुश इंगळे, साथ सेवक फाउंडेशन चे सहसचिव मा.किशोर गावंडे उपस्तीत होते.