ताज्या घडामोडी
बाळापूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने जागतिक कन्या दिनानिमित्त व बाळापूर राष्ट्रवादी कॉग्रेस महिला तालुका अध्यक्ष सौ. सुनीताताई ताथोड यांच्या वाढदिवसानिमित्त बाळापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.त्यावेळी तालुका उपाध्यक्ष रमाताई तायडे,कनिजा परवींन,शाहीन परवीन,सुनीता बोरकर,पुष्पा धुरंधर,ज्योती तायडे,कैलास हिवराळे, उपस्थित होते.तसेच सुनीता ताई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी,स्वतः रक्तदान करून त्यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च आनंद आश्रम येथे अनाथ मुलांना अन्नदान करून,आपला वाढदिवस साजरा केला.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.