ताज्या घडामोडी
विज पडल्याने शेतकरी गंभीर

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर विज पडल्याने शेतकरी गंभीर भाजल्या गेल्याची घटना अकरा ऑक्टोबर रोजी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुर्तीजापुर तालुक्यातील खांदला येथील शेतकरी विजय दशरथ पिंपळे वयवर्ष सत्तेचाळीस व सुनिल आधार मोहीते वय वर्ष पंचवीस हे आपल्या शेतात पीकाची पाहणीसाठी गेले असता दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला तर यामध्ये सदर शेतकरी यांच्या अंगावर विज पडल्याने शेतकरी गंभीर भाजल्या गेले तर या शेतकऱ्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येवुन पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.