विद्यापीठ विद्यार्थ्यांना का छळत आहे? “अक्षय राऊत यांचा विद्यापीठाला सवाल”

अविनाश पोहरे – संपादक
अकोला एक्सप्रेस न्यूज
सं.गा.बा.अ. विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर घाव घालत आहे. Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत फसलेले असतांना. त्यांच्या भविष्याच्या समोर खूप मोठे मोठे प्रश्न त्यांना पडत आहेत अशामध्ये विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रकारची तयारी सुद्धा कदाचित सुरू केली असावी. तेव्हाच शिक्षकांचा संप सामोरे उभा राहला. अर्धवट तयारीत परीक्षेची तारीख सांगण्यात आले विद्यार्थी देखील तयारीला लागले. परंतु पुन्हा विद्यापीठाने परीक्षा रद्द करून पुढे ढकलली. विद्यार्थ्यांना याचा फार मानसिक त्रास सहन करावा लागला. आणि विद्यार्थ्यांनी तो त्रास सहन सुद्धा केला. आता मात्र पुन्हा विद्यापीठाचे आदेश आहे की 12 ऑक्टोबर पासून परीक्षा होतील. 11 ऑक्टोबर च्या सायंकाळ पर्यंत परीक्षा होणार असे सांगणारे अधिकारी आता मात्र परीक्षा पुढे ढकलण्याची भाषा करीत होते. व त्यांनी ही परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना परत मानसिक त्रास देत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शहराच्या ठिकाणी शिकणारे गावातील विद्यार्थी जेव्हा हॉल-तिकिट घेण्यासाठी शहरात येत होते तेव्हा त्यांच्या आरोग्याला असलेला धोका मात्र विद्यापीठाला दिसला नाही. काही विद्यार्थ्यांच्या गावामध्ये बस सेवा उपलब्ध नसतांना ते शहरात येतात आणि तेव्हा त्यांना हॉल-तिकिट दुरुस्ती साठी गेलंय उद्या मिळेल. दिवस संपत आला तरी विद्यार्थ्यांना हॉल-तिकिट देण्यात आले नाही. दिवसभर उपाशीपोटी विद्याथ्यांचे लोंढे तात्काळ ठेवले होते. अशामध्ये जर त्यांना कोरोनाची लागण त्यांना झाली तर यास जबाबदार कोण? ज्या गावात कोरोना नाही तिथल्या विद्यार्थ्यांला झाल्यास गावाच्या स्वस्थाचा जबाबदार कोण? असे एक नाही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु विद्यापीठ मात्र फक्त विद्यार्थ्यांना छळत आहे. विद्यापीठाला विनंती आहे की, आणखी वेळ घेऊन एकच निर्णय घ्यावा आणि त्याची योग्य अंमलबजावणी करावी. विद्यार्थी आपल्या सोबत आहे आपणही विद्यार्थ्यांना समजून घ्यावे.