संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या अकार्यक्षम कार्यपद्धतीचा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला कडून जाहीर निषेध

अविनाश पोहरे – संपादक
अकोला एक्सप्रेस न्यूज
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत होत असणाऱ्या उन्हाळी 2020 च्या परीक्षा ह्या आधी काही कारणास्तव समोर ढकलल्या व त्यानंतर पुन्हा सुनियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले व त्या वेळापत्रकानुसार 12 ऑक्टोबर 2020 पासून परीक्षा चालू होणार तोच संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण समोर आले ते म्हणजे उद्या पेपर तर आज सायंकाळी अचानक वेळापत्रक बदलण्यात येईल व 12 ऑक्टोबर 2020 पासून घेण्यात येणार उन्हाळी 2020ची परीक्षा रद्द करण्यात आली. ह्या सर्व अचानक घेतलेल्या निर्णयाचा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी जाहीर विरोध केला असून दिलेल्या वेळापत्रक नुसारच परीक्षा घ्याव्या व परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जबाबदार राहील ह्याची नोंद घ्यावी व विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परिक्षा देताना ऑनलाईन प्रणाली मध्ये अडचणी व त्रास झाल्यास विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे कुलगुरू व परीक्षा नियंत्रक व राज्यपाल महोदय व शिक्षणमंत्री महोदय ह्यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून केला आहे.