ताज्या घडामोडी
बंद असलेली बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी

हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी, मूर्तिजापूर
मूर्तिजापूर :- तालुक्यात कोरोना महामारिमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस सेवा बंद असल्या कारणाने ग्रामीण भागातील प्रवाशी सोशल दिस्टसिंग चे पालन न करता आपला जीव धोक्यात घालून प्रवास करित आहेत. त्यामुळे कोरोणा चा फैलाव वाढू नये आणि जनसामान्यांना त्याचा त्रासही होऊ नये म्हणून भाजपा तर्फे मूर्तिजापूर आगर कडून बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी विभाग नियंत्रक महाराष्ट्र परिवहन विभाग अकोला यांना निवेदन दिले. यावेळेस भाजपा चे तालुका अध्यक्ष भुषण कोकाटे,शहर अध्यक्ष रितेश गुप्ता,भाजयुमो जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख व भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.