विद्यार्थ्यांना रविवारी सुद्धा उपलब्ध करून दिली हॉलटिकीट मिळण्याची सुविधा

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक – आकाश हिवराळे
अविनाश पोहरे / संपादक
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्राच्या परीक्षा व बॅक लॉक च्या परीक्षा ऑनलाईन प्रणाली द्वारे दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी पासून सुरू करण्याची वेळापत्रक जाहीर केले व त्याअनुषंगाने विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांला हॉल टिकीट मिळणार असून त्यासाठी अगदी परिक्ष तोंडावर येऊन ठेपली असताना सुद्धा विद्यर्थ्यांचे ऑनलाईन प्रणाली नुसार परीक्षा देण्यासाठी लागणारे युसर आयडी व पासवर्ड हा भेटला तरच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो परंतु संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली असून असंख्य विद्यर्थ्यांचे हॉल टिकीट मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्या मध्ये सर्वत्र संभ्रमित वातावरण निर्माण झाले होते व ज्यांना हॉल टिकीट मिळाले त्याचे पाहिजे असलेल्या विषया व्यतिरिक्त दुसरेच विषय छापून आले ह्यासह असंख्य संभ्रम दूर करण्यासाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे परीक्षा नियंत्रक मा. हेमंत देशमुख सर ह्यांना कॉल द्वारे संपर्क करून विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी त्यांना सांगितल्या व उद्या रविवार ही शासकीय सुट्टी असल्यामुळे असंख्य विद्यर्थ्यांना अडचण निर्माण झाली होती तरी उद्या रविवारी सुद्धा सर्व महाविद्यालय सुरू राहतील व विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तरी सर्व विद्यार्थ्यांना ह्याची नोंद घ्यावी असे जाहीर आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.